Ad will apear here
Next
अजिंक्य योद्धा बाजीराव
साताऱ्याचे शाहू महाराज यांच्या दरबारातील पेशवा म्हणजे पंतप्रधान बाळाजी विश्वनाथ यांचे ज्येष्ठ पुत्र बाजीराव. लहान वयातच ते एक उत्तम लष्करी नेता व मुत्सद्दी म्हणून तयार झाले. विसाव्या वर्षांतच त्यांच्याकडे ‘पेशवे’पद सोपविण्यात आले. तेव्हापासून त्यांनी गाजवलेला पराक्रम, नेत्रदीपक व अजिंक्य कारकीर्दीचा परामर्श जयराज साळगावकर यांनी ‘अजिंक्य योद्धा बाजीराव’मधून घेतला आहे.

बाजीराव-मस्तानी संबंधावर भर न देता, पेशवेपदाच्या २० वर्षांच्या अल्प कारकिर्दीत त्यांचे अफाट शौर्य, बुद्धिमत्ता व युद्धनिपुणता हे गुण सामान्यांपर्यंत पोचविण्याच्या प्रयत्न यातून केला आहे. मराठ्यांचा इतिहास, मोगल सत्तेचे कथन करत बाजीराव यांच्या उदयापासून सुरुवात होते. बाजीराव पेशव्यांपुढे निजामाचे आव्हान होते, त्यावर प्रकाश टाकला आहे.

शिव्व्राय व बाजीरावांची युद्धनीती, कर्नाटकच्या मोहिमा, पालखेडचा संग्राम, माळवा, गुजरात, बुंदेलखंडातील कामगिरी याचा आढावा घेताना त्यांच्या सरदारांचा परिचय दिला आहे. बाजीराव बल्लाळ पेशवा यांचे कर्तृत्व व व्यक्तिमत्त्व, कर्तबगारीचा ताळेबंद, त्यांच्या चढाया, हालचाली, प्रशासन या सर्व गोष्टींचा विचार यात मांडलेला आहे.    
      
प्रकाशन : परम मित्र पब्लिकेशन
पृष्ठे : २२३
मूल्य : २२५ रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NZWSBU
Similar Posts
दी ग्रेट गेम पहिल्या महायुद्धानंतर अरबस्तानातील ऑटोमन साम्राज्य लयाला गेले व अनेक नवे देश निर्माण झाले. मध्य पूर्वेस १९१७ नंतर इस्राईल, सौदी अरेबिया, जॉर्डन, सिरीया, इराक असे देश उदयाला आले. रशियाला अफगाणिस्तानमार्गे हिंदुस्तानात येण्यापासून रोखण्यासाठी ब्रिटिशांनी अफगाणिस्तानविरोधात तीन युद्धे लढली.
बिटकॉइन क्रिप्टोकरन्सी बिटकॉइन म्हणजेच आभासी चलन (व्हर्च्युअल मनी) नावाची समांतर अर्थव्यवस्था जगभरात पुढे येत आहे. भारतात रिझर्व्ह बँकेने या चलनावर बंदी घातली आहे. हे चलन कायदेशीर नाही. कोणतीही बँक त्याला तारण अथवा अन्य स्वरूपात स्वीकारत नाही, तरी बिटकॉइनबद्दल कुतूहल आहे. बिटकॉइन म्हणजे नेमके काय, त्याद्वारे व्यवहार कसे होतात,
पुनर्जन्म मिथ्य की तथ्य पौराणिक कथांमध्ये पुनर्जन्माचे अनेक दाखले देण्यात येतात. खरेच असतो का पुनर्जन्म, याच प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा डॉ. विद्याधर गोपाळ ओक यांनी प्रयत्न केला आहे. पुनर्जन्म का, कसा, केव्हा, कोणाचा होतो यांचा विचार पुस्तकात प्रारंभी केला आहे.
हुतात्मा गोविंदराव डावरे काळाच्या पडद्याआड गेलेले हुतात्मा क्रांतिवीर गोविंदराव डावरे यांचे कार्य विनायक पुरुषोत्तम डावरे यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून प्रकाशात आणले आहे. हुतात्मा डावरे यांचे चरित्र सांगताना पुस्तकात प्रारंभी १७२५ ते १८६५ पर्यंतच्या घटनांचे वर्णन केले आहे. त्यानंतरचा भाग गोविंदरावांच्या जन्मापासून सुरू होतो

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language